मुंबई : मुंबईत निवडणूकीत प्रचाराचं तापमान वाढत असताना...वातावरणात सुखद गारवा परत आलाय. आज पहाटे उपनगरातलं किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर कुलाब्यातही पारा 21.6 अंशांवर खाली आलं. फेब्रुवारीतल्या तापमानाची स्थिती बघता नेहमीपेक्षा हे तापमान कमी आहे. 


गेल्या काही दिवसात उत्तरेत झालेल्या हिमपातामुळे मुंबईत गारवा आल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. हवेतला हा गारवा आणखी काही दिवस टिकेल असा अंदाजही वर्तवण्यात आलाय.