मुंबई : प्रसिद्ध सिनेनिर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या बॉडीगार्डनं पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव पाटील यांच्यावर हल्ला केला. मुंबईतल्या जुहूमध्ये गुरुवारी संध्याकाळी सातेसात वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुहूमध्ये फिरोज नाडियादवाल्यांची स्कॉर्पिओ गाडी डबल पार्किंगमध्ये उभी होती. त्यामुळं ट्रॅफिक जॅम झालं होतं. ही गाडी बाजूला घेण्याची सूचना कॉन्स्टेबल बाबुराव पाटील यांनी केली. यावरून नाडियादवालांचा बॉडीगार्ड समर खान आणि पाटील यांच्यामध्ये वाद झाला.


समर खाननं पाटील यांना मारहाण केली. यात पाटील यांच्या मानेला जखम झालीय. त्यांचा मोबाईलदेखील या हाणामारीत फुटला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मात्र अद्यापही समर खानला अटक करण्यात आलेली नाही.