मुंबई : सोशल नेटवर्किंग साईटवर आपला प्रोफाईल फोटो अपलोड करणे मुलुंडमधील एका तरुणीला चांगलचं महागात पडले. या तरुणीने आपला फोटो व्हॉट्स अॅपवर अपलोड केला होता. मात्र तिचा हा फोटो कोणीतरी फेसबूक पेजवर मोबाईल नंबरसह अपलोड केला. त्यानंतर तिला अश्लील फोन कॉल्स येऊ लागले असून मोठा मनस्ताप करावा लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो अपलोड करुन ती व्यक्ती थांबली नाही तर वेगळ्या नावाने तिचा फेसबुक अकाउंट देखील ओपन केले. त्यामुळे गेले दोन महिने या तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि जगभरातून अश्लील फोन कॉल्स येतेत आहे.


गेल्या दोन महिन्यात हजारो फोन नंबर या तरुणीने ब्लॉक केले आहेत. इतकेच नव्हे तर याची तक्रार तिने मुलुंड पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. परंतु दोन महिने उलटून देखील पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. याउलट खासगी सायबर कन्सल्टंटचा मदत घेण्याचा सल्ला दिल्याचा आरोप ही तरुणी करत आहे.


मुलुंड पोलिसांनी आयटी कायद्याअंतर्गत हा गुन्हा नोंदविला असला असला तरी आपण खासगी सायबर कन्सल्टंट नेमण्याचा सल्ला दिला नसल्याचं पोलीस सांगत आहेत. मात्र, तपासात दिरंगाई होत असल्याचे दिसत आहे.