मुंबई : एस्सेल समूहाचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या द Z फॅक्टर यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकाचं प्रकाशन एस्सेल समूहाचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गजांच्या हस्ते करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सर्वांनीच डॉ. सुभाष चंद्रांच्या असामान्य प्रवासाचं तोंड भरून कौतुक केलं. तर या पुस्तकाच्या अनुवादाच्या निमित्तानं मराठी उद्योग साहित्यात मोठी भर पडल्याचं मत  झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांनी व्यक्त केलं. या प्रकाशनावेळी शरद पवार आणि नितीन गडकरींनी डॉ. सुभाष चंद्रांबद्दलचे रंजक किस्से सांगितले.