कैलाश सत्यार्थींच्या घरी चोरी, नोबेल पुरस्कारही चोरीला
नोबेल शांतीपुरस्काराचे विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थींच्या राहत्या घरी चोरी झाल्याचं पुढे आलं आहे. दिल्लीतल्या कैलाश कॉलनीत सत्यार्थींचं घर आहे.
नवी दिल्ली : नोबेल शांतीपुरस्काराचे विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थींच्या राहत्या घरी चोरी झाल्याचं पुढे आलं आहे. दिल्लीतल्या कैलाश कॉलनीत सत्यार्थींचं घर आहे.
सध्या सत्यार्थी हे अमेरिकेत आहेत. चोरट्यांनी सत्यार्थींना मिळालेलं नोबेल मानचिन्हं आणि मानपत्रही लांबवल्याचं प्राथमिक चौकशीत पुढे आलं आहे.