मुंबई: मुंबईच्या विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात गादीच्या दुकानाला आग लागली. या आगीनंतर सिलेंडरचाही स्फोट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आगीमध्ये एका महिलेसह 2 बालकांचा मृत्यू झाला आहे. ही आग विझवण्यात फायर ब्रिगेडला यश आलं आहे. पण फायर वारंवार फोन करुनही फायर ब्रिगेडनं फोन उचलला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 


मुलुंडवरुन गाडी आल्यानंतर आग विझवण्यात आली, त्यानंतर विक्रोळी फायर ब्रिगेडची गाडी आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे काही काळ या भागामध्ये तणावाचं वातावरण होतं.