`टीव्हीएफ`च्या सीईओविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल
ऑनलाईन एंटरटेन्मेंट चॅनल टीवीएफ म्हणजे द व्हायरल फिव्हरचे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबई : ऑनलाईन एंटरटेन्मेंट चॅनल टीवीएफ म्हणजे द व्हायरल फिव्हरचे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बुधवारी रात्री एका तरुणीने अरुणाभ कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ही तरुणी 2016 मध्ये टीवीएफच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेली होती. त्यावेळी अरुणाभ यांनी आपल्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे अरुणाभ यांना अटक होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी या चॅनलमध्ये काम केलेल्या एका माजी महिला कर्मचारीने अरुणाभ यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप ब्लॉगच्या माध्यमातून केले होते. 'इंडियन फॉवलर' नावाचा हा ब्लॉग व्हायरल झाल्यानंतर अनेक तरुणींनी पुढे येऊन अरुणाभ यांच्यावर छेडछाडीचे आरोप केलेत.