मुंबई : कोणी कितीही पारदर्शकतेचा विचार केला तरी आमची कामात  पारदर्शकता आहे. जे (भाजप) हा मुद्दा मांडत आहेत, त्यांच्याकडे किती आहे, असा प्रश्न उपस्थित करुन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वडाळ्यातील सभेत केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत हुतात्मा स्मारकावर भाजप उमेदवारांनी घेतलेली पारदर्शकतेची शपथ म्हणजे नौटंकी आहे. भाजपच्या सभेत होणारी गर्दीही पारदर्शक असल्याचा चिमटा काढत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सभांना मिळणाऱ्या कमी प्रतिसादाची खिल्ली उडवली. भाजपकडे कमळ नाही तर नुसता मळ आहे, तर शिवसेनेकडे काम करण्याची तळमळ आहे असे उद्धव ठाकरे म्हणालेत.


भाषणातील ठळक मुद्दे : 


- भाजपा मेट्रो चे फोटो लावत आहे खरं तर ही मेट्रो काँग्रेस ने आणली आहे
- सुरेश प्रभू यांच्या हाता मधे तर आता अर्थ संकल्प ही नाही हात चोळत बसले आहेत                        
- मुख्यमंत्र्यांनी रात्री रस्त्यावरील खड्डे कसे बुजवले जातात हे पाहावे..
- उद्धव ठाकरे यांचे मुख्य मंत्र्यांना आव्हान                        
- पोलिसांच्या सुरक्षेमुळे आपण निश्चित राहू शकतो.
- पण पोलिसांना भाजप सरकार राबवून घेत आहे 
- मुंबईकरांनी 20 वर्ष भगव्यावर विश्वास ठेवला आहे.
- 25 वर्ष युती मधे सडली नाही तर आज मुख्य मंत्री शिवसेनेचा असता.
- पुढील सर्व निवडणुका आपण एकट्याने लढणार आणि जिंकणार.                        
- मला आता पारदर्शकता सरकारची पाहिजे.
- कॅबिनेट मध्ये विरोधीपक्ष नेता,पत्रकार यांना समोर ठेऊन निर्णय घ्या पारदर्शकता दाखवा                        
- उल्हास नगर ला मोदी शहा यांच्या सोबत ओमी कलानीचा फोटो आहे बर युती नाही नाहीतर माझा ही फोटो ओमी कलानी सोबत असता..                        
- पोलिसांच्या ब्लॅक लिस्ट मधे असणारे आज भाजपच्या स्टेजवर आहेत
- गुंड घेऊन राज्य करण्याचा डाव मुख्यमंत्र्यांचा असेल तर गुंडांचा हात उखडून टाकू.
- गुंडाचा वापर करत निवडणूक जिंकण्याचा डाव मुख्यमंत्री करत असतील तर निवडणुका बाजूला ठेऊन पहिला गुंडांचा बंदोबस्त करू..
- उत्तम जानकर यांनी देवस्थानची जमीन हडप केली. 
- मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोराही दिला होता मात्र त्याच गुंडाला पक्षात घेतले? मुख्यमंत्री जानकर भी अंजाण क्यों बनते है
- मुख्यमंत्र्याना आव्हान आमची कामे खोटे ठरवून दाखवा.
- आम्ही घोटाळे केले नाहीत काय काढणार उकरून ?
- मुख्यमंत्री खोटे बोलतात. मोदी आणि देवेंद्र फडणवीसमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा.