मुंबई : शिवसेना आणि भाजप यांची युती असली तरी दोघांच्यात काहीना काहीतरी प्रश्नावरुन धुसफूस सुरुच असते. आता तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलेय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आधी 'भारतरत्न' द्या असे थेट आव्हान दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. त्यांचा अवमान करून काँग्रेसने सर्वच क्रांतिकरकांचा अवमान केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सावरकरांना तत्काळ 'भारतरत्न' या पुरस्काराने सन्मानित करून काँग्रेसचे तोंड बंद करावे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.


दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाबद्दल काँग्रेसने माफी मागावी, नाहीतर मुंबईत काँग्रेस आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. हाच धागा पकड उद्धव यांनी 'भारतरत्न'ची मागणी पुढे केलेय.


'स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवायला हवी. याआधी सावरकरांच्या अवमानाबद्दल शिवसेनेने अनेकदा आंदोलने केलीत. त्यावेळी आमच्या आंदोलनापासून लांब राहिलेले आज सावरकरांसाठी आंदोलने करीत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. आता 'भारतरत्न' देऊन सावरकरांचा सन्मान करण्याची हिंमत भाजपने दाखवावी, असे खुले आव्हान उद्धव यांनी भाजपला दिलेय.