मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात आजचा दिवस खूप मोठा दिवस होता. १९ जून २०१६ ला शिवसेनेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात शक्ति प्रदर्शन केलं. अवघी मुंबई भगवी करण्यात आली होती. गोरेगाव पूर्व इथल्या नेस्को ग्राउंडवर सुवर्ण वर्षपूर्तीचा सोहळा रंगला. सांस्कृतिक कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर हात घातला. शिवसेनेला गुंड म्हणणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरेंनी चांगलच उत्तर दिलं. 'आम्ही गुंड असतो तर ५० वर्ष टिकलो नसतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. भाजपवर ही उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. लाट निघून गेल्यानंतर गोटे उघडे पडतात असं देखील ते म्हणाले. मुंबई आणि मुंबईतील हिंदू हे फक्त शिवसेनेने वाचवले. हिंदुत्वाच्या मुद्दयावर देखील त्यांनी भाजपवर टीका केली.


शिवसेनेची एकहाती सत्ता आणून दाखवेल असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. एकत्र निवडणुकीच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जाऊ नये असं बाळासाहेबांचं मत होतं. असं ही ते म्हणाले. परदेश दौऱ्यावरुन उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींवर टीका केली. आम्हाला युती तोडायची अजिबात इच्छा नव्हती पण यापुढे युती करु तर स्वाभिमानाने करु लाचारीने नाही. युतीत काय घडतंय याबाबत शरद पवारांनी आम्हाला सल्ले देऊ नये. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. 


आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं. युतीचं काय करायचं याचा निर्णय मी घेईल. शिवसेनाप्रमुखांनी मर्दांचं नेतृत्व केलं, शेळ्यामेंड्याचं नाही हे दाखवून द्या असं देखील उद्धव ठाकरेंनी शेवटी म्हटलं.