मुंबई : मुंबईत आल्यानंतर आणि मुंबईकरांनाही देखील आपल्या परिवारासह जायचं कुठे हा प्रश्नं पडतो. ते इकडे तिकडे फिरतात. खरेदी वगैरे किती करतात याची कल्पना नाही. आता नोटबंदीमुळे तेही सगळं ढेपाळून गेले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीमुळे मुंबईतील पर्यटन ढेपाळून गेला आहे, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  आज पुन्हा एकदा केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चलनशुद्धीच्या  निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल सुरूच ठेवलाय. मुंबईत नोटबंदीमुळे पर्यटन ढेपाळून गेला आहे, असे निरीक्षण ठाकरे यांनी नोंदवले. घाटकोपरच्या आर मॉल मध्ये रेड कार्पेट वॅक्स म्युसियमचे उद्घाटन आज त्यांच्याहस्ते पार पडले. त्यावेळी उद्धव यांनी हे मत व्यक्त केलेय. 


वॅक्स म्युसियममध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या 25 नामवंतांचे मेणाचे पुतळे साकारण्यात आले आहेत. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मेणाच्या प्रतिकृतीला विशेष स्थान देण्यात आले आहे. उद्धघाटनप्रसंगी उद्धव यांच्याहस्ते बाळासाहेबांच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. उद्धव यांनी या उद्घाटनानंतर या म्युझियममधील कलाकृतीची पाहाणी केली आणि त्याचे कौतुकही केले. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना हे कलादालन खुले करण्यात आले.