मुंबई : उद्धव ठाकरेंनी मोदींच्या टोमण्याला प्रति टोमणा हाणलाय. बाळासाहेब आठवले हे बरं झालं..पण बाळासाहेब साहेब सामान्यांचा विचार करायचे, तुम्ही त्यांचा विचार करून निर्णय घ्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेनं तलावर म्यान केलीय.  शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पण जिल्हा बँकांवरचे निर्बंध उठवण्याबद्दल कुठलही ठोस आश्वासन त्यांना मिळालं नाही. 


तुमची आंदोलनं आधी मागे घ्या, मी रिझर्व्ह बँकेशी बोलून जिल्हा बँकांना सामवून घेण्यासाठी काय करता येईल का?, याची चर्चा करतो, असंही मोदींनी शिवसेना खासदारांना आश्वासन दिलंय. दरम्यान मोदींशी चर्चा केल्यावर उद्या होणाऱ्या विरोधकांच्या धऱणे आंदोलनात  शिवसेना सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. 


उलट मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना बाळासाहेबांची आठवण करून दिली. वर जाऊन बाळासाहेबांनी विचारलं, काय काम केलंत तर तुम्ही काय उत्तर द्याल हे माहित नाही..पण मी चांगलं काम करून आलो असं सांगू शकेन, असं मोदींनी म्हटलंय.  नोटाबंदीचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मोदींनी शिवसेना खासदारांना स्पष्ट केलंय.