मुंबई : उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असतानाही हिंदूंवर संकट येत आहेत. काश्मीर आणि अमरनाथ येथे हिंदुवर संकटं आहेत. याकडे सरकारचं लक्ष का नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय.


हिंदुंना एक न्याय आणि झाकीर नाईकला दुसरा न्याय का असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी केलाय. नवनियुक्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.