युतीच्या तब्येतीवर उद्धव ठाकरे म्हणाले...
व्हेंटिलेटरवर असलेली युती आता कासवगतीनं पूर्वपदावर येत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
मुंबई : व्हेंटिलेटरवर असलेली युती आता कासवगतीनं पूर्वपदावर येत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेचे कलावंत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले होते. त्याप्रसंगी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना उद्धव यांनी ही मार्मिक प्रतिक्रिया दिली.
यावेली त्यांनी कुलभूषण जाधवांच्या मुद्यालाही हात घातला. पाकिस्तानशी केवळ पत्रव्यवहार न करता कायमचा धडा शिकवावा अशी सल्ला वजा मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती तुटली होती, मात्र निवडणुकीनंतर युतीचं काय होईल, यावर चर्चा होती. मात्र भाजप आणि शिवसेनेत तुर्तास तणाव निवळल्याचं सांगण्यात येत आहे.