मुंबईत दिसणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
जगासाठी दाऊद हा अंडरवर्ल्ड डॉन असला तरी जेव्हापासून तो मुंबईमधून पळाला आहे तेव्हापासून तो आपल्या आई आणि वडिलांना देखील भेटू शकलेला नाही. ऐवढंच नाही तर तो त्याच्या बहिणीच्या लग्नातही येऊ शकला नव्हता.
मुंबई : जगासाठी दाऊद हा अंडरवर्ल्ड डॉन असला तरी जेव्हापासून तो मुंबईमधून पळाला आहे तेव्हापासून तो आपल्या आई आणि वडिलांना देखील भेटू शकलेला नाही. ऐवढंच नाही तर तो त्याच्या बहिणीच्या लग्नातही येऊ शकला नव्हता.
१७ ऑगस्टला त्याच्या भाच्याचं लग्न आहे. पण तो मुंबईत येऊ शकाणार नाही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो स्काईपच्या माध्यमातून त्याच्या भाच्याच्या लग्नात सहभागी होणार आहे.
मुंबईई क्राईम ब्रांच, एटीएस आणि स्थानिक पोलिसांची या लग्नावर खास नजर असणार आहे. या लग्नात कोण-कोण सहभागी होणार आहे यावर करडी नजर असणार आहे. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर या विवाहात येणार आहे आणि त्याच्यावर लग्नाची जबाबदारी असणार आहे.
लग्नाचं रिसेप्शन ट्यूलिप स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. वलीमाचं शाही पद्धतीने लग्न होणार आहे आणि १० विशेष प्रकारचे फिश डिश आणि १५ प्रकारच्या बिरयानीची मेजवाणी असणार आहे. दाऊदची आवडती मुगलई बिरयानी देखील असणार आहे. लग्नात काही खास लोकांना आमंत्रण असल्याची सूत्रांची माहिती आहे.