COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी राज्यात डान्सबारकरता बारमालकांना परवानगी दिली खरी... पण, अजूनही काही अटींचा पूर्तता झालेली नाही... असं असतानाही मुंबईत सर्रास डान्सबार सुरु आहेत.


दक्षिण मुंबईतल्या ताडदेव भागातल्या इंडियाना, व्हाईट हाऊस आणि ग्रीन बार इथे बारबाला नाचत असून, त्यांच्यावर सारे नियम आणि अटी धाब्यावर बसवून पैशांचा पाऊस केला जात आहे. 


हे खळबळजनक वास्तव एका सामाजिक कार्यकर्त्यानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं आहे. ते फुटेज 'झी २४ तास'च्या हाती लागलं आहे... हा ताडदेवमधला व्हाईट हाऊस बार आहे... या बारमध्ये परवानगी नसतानाही, बेधडकपणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून डान्स बार आणि बारबालांचा नाच सुरुच आहे. 


सुप्रीम कोर्टानं या बारना डान्सबारची परवानगी दिलीय?


सुप्रीम कोर्टाने डान्सबार ना परवानगी द्या असे आदेश दिले होते... त्यानुसार मुंबईतील तीन ठिकाणी डान्सबार परवानगी दिली गेलीय. पण डान्सबार मध्ये स्टेजचा वापर केला जाणार असल्याने नाट्य परिषदेच्या परवानगीची आवश्यकता आहे. ती अजून या तीनही बारना मिळाली नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. हे तीन बार म्हणजे इंडियाना, साईप्रसाद आणि एरो पंजाब....