VIDEO : रेल्वेत खिडकीची जागा पकडली म्हणून पतीनं महिलेला केली मारहाण
अमानवी असं एखादं कृत्य आपल्यासमोर घडतंय... आपण ते पाहतोय... आपल्याला ते पटत नाहीय... पण, ते थांबवण्याची हिंमत मात्र आपल्यात नाही... हेच ठळ्ळकपणे सांगणारी एक घटना टिपणारा एक व्हिडिओ सध्या सोशळ वेबसाईटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
मुंबई : अमानवी असं एखादं कृत्य आपल्यासमोर घडतंय... आपण ते पाहतोय... आपल्याला ते पटत नाहीय... पण, ते थांबवण्याची हिंमत मात्र आपल्यात नाही... हेच ठळ्ळकपणे सांगणारी एक घटना टिपणारा एक व्हिडिओ सध्या सोशळ वेबसाईटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
बुरखा घालून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेला तिच्याच सोबत असणाऱ्या तिच्या पतीन क्षुल्लक कारणावरून भर रेल्वेत मारहाण केली... आणि लोक फक्त पाहतच राहिले.
खिडकीच्या शेजारी बसली म्हणून या मध्यमवयीन महिलेला तिच्या पतीन मारहाण केलीय, असं या व्हिडिओतील त्यांच्या संवादावरून दिसतंय. घरगुती हिंसाचार म्हणजे घरात नव्हे तर हा सार्वजनिक ठिकाणी झालेला हिंसाचार होता, तरीही उपस्थितांपैंकी कुणालाही यात हस्तक्षेप करावासा वाटला नाही.