मुंबई : बॅंक कर्जबुडव्या विजय माल्या याला जोरदार दणका देण्यात आलाय. ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या माल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केलेय. तब्बल १४११ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयडीबीआयच्या ९०० कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने विजय माल्ल्यांची १४११ कोटींची संपत्ती जप्त केलेय. विशेष म्हणजे ईडी सध्या फक्त आयडीबीआयच्या ९०० कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करीत आहे. इतर तपासयंत्रणांशी चर्चा केल्यानंतर १७ बँकांच्या थकलेल्या ९००० कोटी कर्जासंबंधीही तपास केला जाण्याची शक्यता आहे. 



 
मद्यसम्राट विजय माल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माल्यांना रेड कॉर्नर नोटीस पाठवण्यासाठी इंटरपोलकडे विनंती केलेय.



 
विजय माल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिला होता. माल्ल्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. रेड कॉर्नर नोटीस जारी केल्याने माल्ल्या यांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता आहे.