मुंबई : मतदानाच्या दिवशी बऱ्याचदा मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळ झाल्याच्या घटना पाहायला मिळतात. आपलं मतदान यादीत नाव आहे की नाही, मतदान कुठल्या मतदान केंद्रावर करायचं असे अनेक प्रश्न पडतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एका क्लिकवर मिळवू शकता. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं नाव, मतदान केंद्र याची माहिती मिळवू शकता.


यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर आपल्या विषयी अथवा आपल्या वॉर्ड विषयी दिलेली थोडीशी माहिती ऑनलाईन दिल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव यादीत ऑनलाईन दिसणार आहे.