मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉशिंग मशीनच्या मोटरमधून १९ बिस्कीटं हवाई गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी मोहम्मद अस्लम शेख याला अटक करण्यात आली आहे.


अशी झाली अटक :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेख याच्याकडे भारताचा पासपोर्ट होता. सोमवारी सकाळी रियाधमधून शेख मुंबई विमानतळावर दाखल झाला. त्यांच्यांकडे जे सामान होतं त्यात वॉशिंग मशिनसाठी लागणारी मोटारही होती. त्यांच्या सामानाची तपासणी करत असताना हवाई गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ती मोटार उघडून पाहिली तर त्यामध्ये सोन्याची १९ बिस्कीटे असल्याचे दिसून आले.


चौकशीतून काय आले समोर :


विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर शेखला एक व्यक्ती भेटणार होता. त्याला ही बिस्कीटे द्यायची होती. त्या व्यक्तीचे नाव सलमान खान असून त्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.


या सोन्याच्य़ा बिस्कीटांची किंमत ६०.१५ लाख रुपये आहे. या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे.