जलसंपदा विभागाच्या सल्लागारांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा
मुंबई : जलसंपदा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी नियुक्त केलेले सल्लागार एच. टी. मेंढेगिरी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.. निवृत्त झाल्यानंतर राज्यसरकारने जलसंपदा विभागातील कारभार सुधारण्यासाठी त्याचबरोबर या विभागात असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
गेल्या दोन महिन्यांत त्यांचा दर्जा काय हे ना सरकारने ठरविले ना त्यांना कुठल्या सुविधा देण्यात आल्या. शिवाय त्यांनी सुधारणांच्या अनुषंगाने दिलेल्या सल्ल्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे कानाडोळा केला. त्यामुळे वैतागलेल्या मेंढेगिरी यांनी सल्लागारपदाचा राजीनामा दिला.
८ मार्च रोजी राजीनामा देऊन त्यांनी मुंबईही सोडली. मात्र त्यांचा राजीनामा अजूनही स्वीकारला गेला नाही आणि चर्चाही झाली नाही. सरकारला माझी गरज नसेल म्हणून मी राजीनामा दिल्याचं मेंढेगिरी यांनी म्हंटलय.