मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ११ पासून ठप्प झालेली सेवा, १५ मिनिटात सुरळीत करणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तांत्रिक बिघाड शोधून काढण्यास रेल्वेला यश आलं आहे, माहिम स्टेशनजवळ बॅटरी बॉक्स चोरी गेल्याने रेल्वे ठप्प झाल्याचं पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे.


चोरीमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प


पावसामुळे अथवा वायरीत कोणताही बिघाड नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सुरूवातीला बिघाड कशात झाला आहे, हे स्पष्ट होत नसल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती.


मात्र आता बॅटरी बसवण्याची तयारी होत असल्याने ही वाहतूक पूर्ववत सुरू होईल असा दावा पश्चिम रेल्वेचा आहे.