मुंबई : मुंबईतल्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटवर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुरुवारी छापा टाकला. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीची ही वेलिंगकर इन्स्टिट्यूट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या छाप्यात वेलिंगकरचे संचालक उदय सांळुखे यांचे सहाय्यक समीर कारखानीस यांच्या घरीही छापा टाकण्यात आला. तर साळुंखे यांचे दुसरे सहाय्यक प्रमोद मुळीक यांच्या कार्यालयाचीही झडती घेतली गेली. या छाप्यात साळुंखेंचे सहाय्यक कारखानीस आणि मुळीक यांच्या लॉकर आणि कपाटातून महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली गेलीत. तसंच काँप्युटरच्या हार्ड डिस्कही जप्त करण्यात आल्यात. 



तर उदय साळुंखे यांना पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अर्थिक गुन्हे शाखेनं दिलेत. बनावट मतपत्रिका प्रकरणी हे छापे घातले गेले. शिक्षण प्रसारक मंडळीच्या विश्वस्त मंडळाची नुकतीच निवडणुक झाली. मतदानाच्या आदल्या दिवशी माजी अध्यक्ष अभय दाढे यांच्याकडे बनावट मतपत्रिका आढळून आल्या होत्या. संस्थेतले आर्थिक गैरव्यवहार दडपण्यासाठीच या बनावट मतपत्रिका छापण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.