मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक महत्वाची बातमी. जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान आज राम मंदिर या नव्या स्थानकाचे उद्घाटन होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतरं याआधीच हे स्टेशन सुरू होणार होतं. पण राजकीय सुंदोपसुंदीत उद्घाटन लांबणीवर पडलं. अखेर आज दुपारी चार वाजता रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत स्टेशनचं उद्घाटन होईल. 


पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेतील धीम्या लोकल राम मंदिर स्टेशनवर थांबतील. हे रेल्वे स्टेशन सुरू झाल्यानं ओशिवरा परिसरात राहणाऱ्या हजारो प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.