मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक मागील अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतूक ठप्प असण्यामागे तांत्रिक बिघाडाचं कारण असल्याचं पश्चिम रेल्वेच्या सुत्रांनी सांगितलं आहे, पण हा तांत्रिक बिघाड पावसामुळे आला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


पहिल्या रिमझिम पावसात पश्चिम रेल्वे ठप्प झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र प्रवाशांचे यामुळे हाल होतायत. ही सेवा अर्ध्या तासात सुरू होईल असा दावा पश्चिम रेल्वेचा आहे.