मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. बॅटरी बॉक्स चोरीमुळे वाहतुकीला खोळंबा आला होता, बॅटरी बॉक्स नसल्यामुळे आलेला बिघाड दुरूस्त करण्यात पश्चिम रेल्वेला यश आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेची वाहतूक आज तासाभरापेक्षा जास्त वेळ खोळंबली होती, सर्वात जास्त अडचण वांद्रे ते चर्चगेट दरम्यान आला होता, दरम्यान पश्चिम रेल्वेने फास्ट आणि स्लो मार्गावरील काही गाड्या चालवण्याचा प्रयत्न केला होता.


तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ११ पासून ठप्प झालेली सेवा, दुपारी साडेबारापासून पूर्ववत होत असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला होता.


सुरूवातीला नेहमीप्रमाणे ओव्हरहेड वायर आणि पावसामुळे ही अडचण आली असावी असा अंदाज व्यक्त होत होता, मात्र चोरीमुळे लोकल वाहतूक ठप्प झाल्याचं धक्कादायक कारण समोर आलं.