कधी दाखल होणार मुंबईकरांच्या सेवेत एसी लोकल
बहुचर्चित बहुप्रतिक्षित मुंबईची एसी लोकल ट्रेन अजूनही सुरू झालेली नाही. ६ महिन्यांपूर्वीच ही लोकल मुंबईत दाखल झालीय.
मुंबई : बहुचर्चित बहुप्रतिक्षित मुंबईची एसी लोकल ट्रेन अजूनही सुरू झालेली नाही. ६ महिन्यांपूर्वीच ही लोकल मुंबईत दाखल झालीय.
मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती सुरू होण्यास विलंब लागत आहे. कोणतीही चूक यात राहू नये, म्हणून पुन्हा-पुन्हा चाचण्या घेतल्या जात आहेत.
या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकलची पुन्हा एकदा चाचणी सुरू झाली आहे. एकूण १६ प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.