मुंबई : एकीकडे सदाभाऊंची भाजपाशी जवळीक वाढल्याचं चित्र असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत भाजप फूट पाडत असल्याच्या आरोपांचा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी इन्कार केला आहे. निवडणुका संपल्या की मित्रपक्षांची नाराजी दूर होऊन पुन्हा सरकार उत्तमप्रकारे चालेल, असा दावाही त्यांनी झी 24 तासवरील रणसंग्राम कार्यक्रमात केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीमध्ये आज झालेल्या भाजपाच्या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे क्रमांक दोनचे नेते सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. इतकंच नव्हे, तर त्यांनी गळ्यात चक्क भाजपचा स्कार्फ घातला होता. मित्रपक्षाचे नेते आणि मंत्री या नात्यानं मुख्यमंत्र्यांच्या बाजुची खुर्ची एकवेळ समजण्यासारखी आहे. पण दुसऱ्या पक्षातून प्रवेश देताना गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालण्याची सध्याची प्रचलित पद्धत असताना सदाभाऊंच्या गळ्यातला कमळाचा स्कार्फ सर्वांचच लक्ष वेधून घेत होता. विशेषतः सागर खोतांच्या उमेदवारीवरून पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्याशी वाद झाला असताना सदाभाऊंची भाजपशी वाढलेली ही जवळीक खूप काही सांगून जाणारी आहे.


पाहा व्हिडिओ