भांडणानंतर `ती`नं चिमुरडीला 15 व्या मजल्यावरून खाली फेकलं
भायखळामध्ये एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरुन पाच वर्षांच्या मुलीला खाली फेकल्यानं त्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय.
मुंबई : भायखळामध्ये एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरुन पाच वर्षांच्या मुलीला खाली फेकल्यानं त्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय.
मानवी असं त्या मुलीचे नाव असून पोलीस कॉन्स्टेबल आरती इंगळे या महिलेची ती मुलगी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.
सोमवारी दुपारी 12.30 वाजल्याच्या सुमारास भायखळ्यातील विघ्नहर्ता इमारतीत हा प्रसंग घडला. आरती यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं हे कृत्य केल्याचं समोर येतंय.
आरती आणि शेजारी राहणाऱ्या महिलेचं याआधी भांडण झालं होतं. या भांडणानंतर या महिलेनं रागाच्या भरात पाच वर्षांच्या मानवीला 15 व्या मजल्याच्या बाल्कनीवरून खाली फेकून दिलं.
या घटनेनंतर मानवीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं तिला मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहेत.