मुंबई : अखेर, मुंबईच्या हाजीअली दर्ग्यातील मुख्य भागात महिलांना प्रवेश खुला करण्यात आलाय. जवळपास ५० हून अधिक महिलांनी या दर्ग्यात जाऊन चादर चढवलीय... उल्लेखनीय म्हणजे, या दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावं लागलेलं नाही. तब्बल पाच वर्षानंतर महिलांना दर्ग्यात प्रवेश मिळालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टानं दर्गाच्या आतील मुख्य भागातही महिलांना प्रवेश देण्याचा आदेश दिला होता. 


यापूर्वी, हाजीअली दर्ग्याच्या मुख्य भागात महिलांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं होतं. याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या महिलांना काही कट्टरतावाद्यांकडून प्रखर विरोधही करण्यात आला होता. 


दर्ग्याच्या मुख्य भागात महिलांना प्रवेश देण्यापासून वंचित ठेवण्याच्या या दर्गा प्रशासनाच्या निर्णयाला जाकिया सोमन आणि नूरजहाँ यांनी कोर्टात आव्हान दिलं होतं. 


यावंर, कुराणात असा उल्लेख असेल तरच हाजी अली दर्ग्यातील मुख्य भागात महिलांना प्रवेश दिला जाऊ नये, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारनं कोर्टात मांडली होती.