मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लाईफ लाईऩ असलेली रेल्वेही सज्ज झालीय. 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईकर आणि पर्यटकांसाठी सीएसटी आणि चर्चगेट स्थानकावरुन जादा लोकल सोडण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएसटी स्थानकावरुन शेवटची लोकल 31 तारखेला रात्री 1.30 वाजता निघणार आहे. तसेच कल्याण स्थानकावरुनही रात्री 1.30 वाजता शेवटची लोकल सीएसटीसाठी निघणार आहे. 


गेट वे ऑफ इंडिया,मरीन ड्राईव्ह, कुलाबा, गिरगाव चौपाटी अशा ठिकाणी पर्यटनासाठी जमणारे मुंबईकर रात्री उशिरा रेल्वेचा प्रवास करतात. यामुळे रेल्वे पोलिसांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया हे पथक साध्या वेशात काम करणार आहे. 


प्रवासादरम्यान, महिलांना कोणतीही अडचण आली तर रेल्वे हेल्पलाईन आणि उपस्थित असणा-या पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 


 


Western Railway will run 8 special local train services between Churchgate and Virar on New Year eve i.e. during night between 31st Dec, 16 and 1st Jan, 17


पश्चिम रेल्वे ३१ डिसेंबरसाठी ८ विशेष गाड्या चर्चगेट ते विरार आणि विरार- चर्चगेट दरम्यान चालविणार आहे. 


Details are as under:-


DN Train  CCG dep.        VR arr
Spl 1        01.15.              02.55
Spl 3          02.00.             03.40
Spl 5          02.30.             04.10
Spl 7.         03.25.             05.05


 


UP Train  VRdep.           CCGarr
Spl 2          00.15.             01.47
Spl 4          00.45.             02.17
Spl 6          01.40.             03.12
Spl 8.         03.05.             04.37