मुंबई : मुंबईच्या महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे यशवंत जाधवांचं नाव महापौरपदाच्या शर्यतीतून आपोआपच बाद झालंय. त्यामुळे सध्या आशिष चेंबुरकर आणि मंगेश सातमकर यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आलीय. 


दरम्यान सत्ता स्थापन करण्यासाठी आणि संख्याबळ सिद्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेचे  सेना नगरसेवक आज कोकण भवन रवाना झाले. 


सत्ता स्थापण्यासाठी संख्याबळाची यादी आणि अपक्ष पाठींबाबाबत माहिती विभागीय आयुक्तांना दिली जाणार आहे. यासाठी सकाळपासून महापौर बंगला येथे सेना नगरसेवक जमू लागले. शिवसेनेकडे स्वतःचे 84 आणि चार अपक्ष अपक्षांचा पाठिंबा आहे.