विरार-चर्चगेट रेल्वेत तरुणीला महिलांच्या टोळक्याकडून मारहाण
वसईला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणीला विरार रेल्वेतील महिलांच्या एका गटाने मारहाण केलीय.
मुंबई : वसईला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणीला विरार रेल्वेतील महिलांच्या एका गटाने मारहाण केलीय.
ऋतुजा नाईक असं पीडित तरुणीचं नाव आहे. इंजिनिअरिंगला शिकणारी ऋतुजा २० वर्षांची आहे. वसईला जाण्यासाठी निघालेली ऋतुजा विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून ८.४० च्या विरार-चर्चगेट रेल्वेत महिलांच्या डब्यात चढली.
वसई आल्यानंतर जेव्हा तीने उतरण्याचा प्रयत्न करत असताना काही महिलांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात करण्यात आली. वसईला उतरायचं असेल तर बोरीवली, अंधेरी आणि वांद्र्यापर्यंत असणाऱ्या लोकलमध्येच चढायचं, असा तिला न मागता सल्लाही मिळाला.
डब्यात असलेल्या महिलांच्या घोळक्याची मजल इथवरच थांबली नाही तर त्यांनी ऋतुजाला मारहाणही केली... यामुळे ऋतुजाला अस्थमाचा अटॅकही आला.
यामुळे धास्तावलेल्या ऋतुजानं वसईला उतरल्याबरोबर रेल्वे पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात ही तक्रार दाखल कीलय. महिलांची एक टीम या महिलांची ओळख पटवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार आहे.