रिओ : ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचा इरादाच पक्का मनात बांधला होता. तुला मेडल जिंकायचे आहे, हे सतत मन सांगत होते. ते मी करुन दाखवलं. 10 ते 12 वर्षांपासून माझी तपस्या फळाला आली आहे. मेडल मिळाले तर मी भारताचा तिरंगा घेऊन ऑलिम्पिकमधील मैदानावर धावणार हे मनात आधीच ठरवले होते. ते मी केले. मनात कधीच नकारात्मक भावना आणल्या नाहीत. मी 10 सेकंदात प्रयत्न केला तर मी मेडल नक्कीच जिंकणार हे सातत्याने बजावत आले. त्यात मी यशस्वी झाले. मेडल जिंकल्याचे बेस्ट फिलिंग आहे, अशी प्रतिक्रिया मल्ल साक्षी मलिकने विजयानंतर दिली.


साक्षीने आपले मेडल सर्वांनाचा डेडीकेट केले. सर्वांच्या शुभेच्छा असल्यामुळे माझ्यावतीने देशाला पहिले मेडल मिळाले आहे. याचा मला मोठा अभिमान आहे. भारतीय खेळाडू चांगले खेळत आहेत. मात्र, कोणतेही मेडल मिळत नव्हते. ही खंत होती. ही खंत सतत सतावत होती. माझ्यात नकारात्मक भावना नव्हती. मी मेडल जिंकणार आणि जो ठपका होता तो पुसणार, हा माझा निर्धार होता. तो मी पूर्ण करणार, असे सारखे वाटत होते, असे साक्षीने सांगितले.


पाहा काय म्हणाली साक्षी?