नवी दिल्ली : जगात एक गोष्ट अनेकदा लक्षात आली आहे की जर तुम्ही कोणतीही गोष्ट मनापासून करण्याची तयारी दाखवता तर तुम्ही ती करुन दाखवताच. अनेक जण कठीण अशा परिस्थितीतूनही मोठं यश मिळवतात. अशीच काही गोष्ट आहे भारतीय ज्यूनिअर हॉकी संघाच्या ७ खेळाडूंची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ वर्षानंतर जूनियर हॉकी वर्ल्‍ड कपच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या भारतीय संघाच्या ७ खेळाडूंचे वडील हे ड्रायव्हर आहेत. हरजीत सिंह, विकास दहिया, कृष्‍ण बहादुर पाठक, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, सुमित कुमार आणि अजीत कुमार पांडे यांचे वडील डायव्हर आहेत.


१. अजीत कुमार :


अजीतचे वडील जय प्रकाश हे एका व्यापाऱ्याकडे काम करायचे. उत्‍तर प्रदेशातील गाजीपूरचे राहणारे तेज बहादुर गे खेळप्रेमी होते. त्यामुळे त्यांनी एका शाळेत हॉकी अॅकेडमी सुद्धा सुरु केली. यासाठी त्यांनी आर्टिफिशियल टर्फ देखील बनवलं आणि हॉकी स्टिक देखील पुरवल्या. अजीतने म्हटलं की, 'एका ट्रिप दरम्यान भाऊ तेजबहादुर यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की, त्याला देखील हॉकी अॅकडमी ज्वाईन केली पाहिजे. त्याच्या पुढच्या सकाळी तो हॉकीच्या पिचवर पळत होता.


२. हरमनप्रीत सिंह :


हरमनप्रीत सिंह लहान असतांना ट्रॅक्टर चालवणे त्याला खूप आवडायचं. वडिलांसोबत तो ट्रॅक्टर चालवायचा. पण गेअर बदलणं त्याला जमत नव्हते. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की, ट्रॅक्‍टर कशी चालवतात तेव्हा गेअर बदलण्याची प्रक्रिया सर्वात कठीण असते. वेळ बदलला तसं तो हे सगळं शिकला आणि त्यामुळे त्याचे खांदे अजून मजबूत झाले.


३. वरुण कुमार :


वरुण कुमारचे वडिल ब्रह्मानंद पंजाबमध्ये मेटाडोर 407 चालवतात.


४. विकास दहिया :


विकास दहियाचे वडील दलबीर सोनीपतमध्ये प्रायवेट फर्ममध्ये ड्रायव्हर आहेत.


५. कृष्‍ण बहादुर पाठक :


कृष्‍ण बहादुरचे वडील टेक बहादुर क्रेन ऑपरेटर होते. त्यांचं याच वर्षी निधन झालं.


६. सुमित कुमार :


सुमित कुमारचे वडील रामजी प्रसाद वाराणसीमध्ये ड्रायव्हर आहेत.


७. हरजीत सिंह


हरजीत सिंह यांचे वडील देखील ड्रायव्हर म्हणून काम करायचे.