दुबई : अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विश्वविक्रम केला आहे. एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दोन हाफ सेंच्युरी मारण्याचा पराक्रम शहजादनं केला आहे. दुबईमध्ये झालेल्या डेसर्ट टी-20 चॅलेंज या स्पर्धेमध्ये शहजादनं या विक्रमाला गवसणी घातली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबरोबरच शहजादनं आयसीसीच्या टी-20 स्पर्धेमध्ये सर्वाधिक हाफ सेंच्युरी मारण्याच्या विराट कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. विराट कोहलीनं 2014साली बांग्लादेशमध्ये झालेल्या टी20मध्ये कोहलीनं चार हाफ सेंच्युरी झळकावल्या होत्या.


शहजादनं या स्पर्धेमध्ये 50 च्या सरासरीनं 300 पेक्षा जास्त रन केल्या. या स्पर्धेची सेमी फायनल आणि फायनल एकाच दिवशी घेण्यात आली होती. ओमानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शहजादनं 80 रन केल्या तर फायनलमध्ये त्यानं आयर्लंडविरुद्ध 52 रनची खेळी केली. शहजादच्या या कामगिरीमध्ये अफगाणिस्ताननं सेमी फायनल आणि फायनलही जिंकली.