विजयाचे असेही सेलिब्रेशन
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. वेगवेगळ्या अंदाजात खेळाडू हा आनंद साजरा करतात.
रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. वेगवेगळ्या अंदाजात खेळाडू हा आनंद साजरा करतात.
काहींना या वेळी आनंदाश्रू आवरत नाहीत तर काहीजण अक्षरश: आनंदाने नाचतात. जपानच्या एका महिला कुस्तीपटूने सुवर्णपदक पटकावल्यानंतर एका वेगळ्याच अंदाजात आपला आनंद व्यक्त केला.
63 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात जपानच्या रिसाको कोवाईने सुवर्णपदक जिंकले. पदक मिळवल्याचा तिला इतका आनंद झाला की तिने आपल्या कोचला अक्षऱश: मॅटवर आपटले आणि हे तिने एकदाच नव्हे तर दोनदा केले.
त्यानंतर तिने आपल्या कोचला खांद्यावर उचलून घेत विजयाचा आनंद साजरा केला. कोवाईने बेलारुसच्या मारिया मामाशूक हिचा पराभव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. विजयाचे हे अनोखे सेलिब्रेशन सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले होते.