रहाणेचा तो कॅच ठरला सिक्स...
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात पुण्याने मुंबईला हरवत अंतिम फेरी गाठली. मुंबईन टॉस जिंकत पुण्याला फलंदाजीचे निमंत्रण दिले. पुण्याने 20 षटकांत मनोज तिवारी 58, अजिंक्य रहाणे 57 आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर 4 गडी गमावत 162 धावा केल्या.
मुंबई : आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात पुण्याने मुंबईला हरवत अंतिम फेरी गाठली. मुंबईन टॉस जिंकत पुण्याला फलंदाजीचे निमंत्रण दिले. पुण्याने 20 षटकांत मनोज तिवारी 58, अजिंक्य रहाणे 57 आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर 4 गडी गमावत 162 धावा केल्या.
हे आव्हान मुंबईसाठी काही मोठे नव्हते. मात्र पुण्याच्या गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज पार ढेपाळले. पार्थिव पटेलच्या 52 धावांच्या खेळीव्यतिरिक्त मुंबईच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. 20 षटकांत मुंबईला केवळ 142 धावा करता आल्या.
या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या दमदार खेळीसोबत त्याची खिलाडूवृत्तीही दिसून आली. जयदेव उनादकटच्या गोलंदाजीवर मॅक्लेघनने जोरदार शॉट मारला. यावेळी रहा बाऊंड्रीजवळ कॅच घेत अजिंक्यने स्टीव्हन स्मिथच्या दिशेने बॉल फेकला. मात्र हा कॅच घेताना त्याचा पाय बाऊंड्री लाईनला लागला होता. त्यामुळे रहाणेने दोन्ही हात वर करताना सिक्स असल्याचे अंपायरला सांगितले. मात्र त्याआधीच अंपायने आऊट असल्याचा इशारा दिला होता.
यावेळी तिसऱ्या अंपायरची मदत घेण्यात आली. या रिव्ह्यूमध्ये अजिंक्यचा पाय बाऊंड्री लाईनला लागल्याचे स्पष्ट झाले आणि हा कॅच सिक्स ठरला. मात्र या सिक्सपेक्षा अजिंक्यच्या खिलाडूवृत्तीने साऱ्यांचे मन जिंकले.