मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांना हटवण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. अलीम दार यांच्याऐवजी आता श्रीलकेंच्या कुमार धर्मसेना यांची या सीरिजसाठी वर्णी लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही मुंबईतल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्ट मॅचवेळी अलीम दार यांना शिवसेनेच्या विरोधामुळे डच्चू देण्यात आला होता. भारत आणि इंग्लंडमध्ये नऊ नोव्हेंबरपासून पाच टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 ची सीरिज होणार आहे.