राष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण
इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते.
कोलकाता : इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते.
त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी चार कोटी रुपये घेतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. यावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली. मात्र अमिताभ यांनी अशा प्रकारचं कोणतही मानधन घेतलं नव्हत असं स्पष्टीकरण बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीने दिलंय.
इतकंच नव्हे तर अमिताभ यांनी स्वत:च्या पैशाने विमानाची बुकिंग तसेच हॉटेलचे पैसे चुकते केल्याचेही गांगुली म्हणाला.
दरम्यान, राष्ट्रगीत म्हणण्यासाठी पैसे घेणारा माणूस गरीब मनाचा असल्याची प्रतिक्रिया बिग बींनी दिली.