भारत-पाक मॅचअगोदर बीग बी गाणार राष्ट्रगीत
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहेत.
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहेत.
१९ मार्च रोजी होणाऱ्या भारत - पाकिस्तान मॅचदरम्यान होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप मॅचच्या अगोदर बीग बी ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या बातमीला दुजोरा दिलाय.
तर, दुसरीकडे पाकिस्तानचे क्लासिकल गायक शफाकत अमानत अली पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाताना दिसतील.