नवी दिल्ली : चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी विश्वचषक भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेधत जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली आहे. २१ वर्षीय दीपिकाने तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये ७२० पैकी ६८६ गुण मिळवत दक्षिण कोरियाची तिरंदाज को बो बे हिच्या २०१५ सालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाला आणखी एक गुण जास्त मिळाला असता तर महिला तिरंदाजी विश्वचषकात नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला असता. दीपिकाला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचेही तिकीट मिळाले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पूर्वीच मिळालेल्या या महत्तवपूर्ण यशामुळे दीपिकाच्या आत्मविश्वासात आणखी भर पडली आहे.


२०११, २०१२ आणि २०१३ साली दीपिकाने विश्वचषकात रौप्यपदकाची कमाई केली होती. पद्मश्री पुरस्कारानेही तिला गौरविण्यात आले आहे. २०१० साली राष्ट्रकूल स्पर्धेतही तिने वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती तर आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला कांस्य पदक मिळालं होतं.