मुंबई : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने जगापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. पण ५ दिवसानंतर ती सगळ्यांन समोर आली आहे. अश्विन दुसऱ्यांना वडील झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनची पत्नी प्रीती नारायणने एका मुलीला जन्म दिला आहे. प्रीतीने ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ट्विट करत तिने म्हटलं की, २१ डिसेंबरला तिने कन्येला जन्म दिला. सोबतच तिने ही गोष्ट लपवण्यामागचं कारणही सांगितलं आहे.


प्रीती नारायण म्हणते की, ती क्रिकेटर ऑफ द ईयर बनण्याचा आनंद कमी नाही करु इच्छित. त्यामुळे तिने ही गोष्ट ५ दिवस लपवून ठेवली. जुलै २०१५ मध्येही अश्विनच्या पत्नीने कन्येला जन्म दिला होता. तिचं नाव अकिरा ठेवण्यात आलं आहे.