पुणे : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 4 विकेटच्या मोबदल्यात 143 रन बनवल्या आहेत. कांगांरूंकडे आता तब्बल 298 रनची आघाडी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या एकाच दिवसामध्ये तब्बल 15 विकेट पडल्यामुळे ही मॅच जिंकण्यासाठी भारताला इतिहास रचावा लागणार आहे. पहिल्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाचे 256 रनमध्ये 9 बॅट्समन आऊट केल्यानंतर आज ऑस्ट्रेलिया 260 रनवर ऑल आऊट झाली.


यानंतर बॅटिंगला आलेल्या भारतीय बॅट्समननं पुरती निराशा केली. भारतीय टीम अवघ्या 105 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियच्या स्टीव्ह कीफेने तब्बल ६ विकेट घेत भारताच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले. सलामीवीर लोकेश राहुलच्या ६४ धावांव्यतिरिक्त भारताच्या एकाही फलंदाजांला चांगली कामगिरी करता आली नाही. भारताचे ८ फलंदाज केवळ एकेरी तर काही शून्यावर बाद झाले. भारत पहिल्या डावात १५५ धावांनी पिछाडीवर आहे.