४ चेंडूत ९२ धावा, पहिल्याच षटकात सामन्याचा निकाल
क्रिकेट खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. असाच धक्कादायक निकाल लागला. पहिल्याच षटकात सामना जिंकला गेला. केवळ ४ चेंडूनत ९२ धावा काढण्याचा विक्रम नोंदविला गेलाय.
ढाका : क्रिकेट खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. असाच धक्कादायक निकाल लागला. पहिल्याच षटकात सामना जिंकला गेला. केवळ ४ चेंडूनत ९२ धावा काढण्याचा विक्रम नोंदविला गेलाय.
बांग्लादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या एका स्थानिक क्रिकेट सामन्यात केवळ ४ चेंडूत ९२ धावा ठोकल्या गेल्यात. या सामन्याच्या पहिल्या षटकामध्ये सामन्याचा निकाल लागला. ८८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या संघाने फक्त ४ चेंडूत सामना जिंकण्याची कमाल केली.
मात्र, हे यश त्या संघाचं नसून या निकालामागे एक गोष्ट घडली आहे. अॅक्झिऑम आणि लालमाटिया या दोन संघात सामना होता. लालमाटिया संघाने अॅक्झिऑम संघासमोर विजयासाठी ८८ धावांचं आव्हान ठेवलं होते. जे अॅक्झिऑमने फक्त ४ चेंडूत पूर्ण केले.
लालमाटियातर्फे सुजॉम मेहमूद नावाच्या गोलंदाजाला नवा चेंडू सोपवण्यात आला. त्याने १५ नो बॉल आणि ६५ वाईड टाकले. त्यामुळे अॅक्झिऑम संघाला ८० धावा मिळाल्यात. याशिवाय सलामीच्या फलंदाजाने नोबॉलवर १२ धावा काढत संघाच्या ९२ धावा झाल्या. त्यामुळे हा सामना फक्त ४ बॉलमध्ये संपला.
निषेध म्हणून अशी कामगिरी केल्याची नोंद झालेय. अदनान दीपॉन जे लालमाटिया संघाचे महासचिव आहेत. त्यांनी ‘ढाका ट्रीब्यून’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, आमच्या संघाला नाणेफेकीपासून डावलण्यात येत होते. नाणेफेकीचं नाणं देखील आम्हाला दाखवण्यात आले नाही. आम्हाला पहिले फलंदाजीला पाठवण्यात येईल, अशी आमची शंका होती ती नाणेफेकीनंतर खरी ठरली. त्यानंतर पंचानीही पक्षपातीपणे निर्णय दिले याचा निषेध करण्यासाठी सुजॉन मेहमूदने अतिरिक्त धावा दिल्या.