बांग्लादेशचा कर्णधार मुर्तजाने धरले युवराजचे पाय
टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.
नवी दिल्ली : टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सिरीजमध्ये भारताचा सामना यजमान बांग्लादेश सोबत होणार आहे. यासाठी बांग्लादेश देखील सज्ज झालाय.
आज भारतीय संघाने नेटमध्ये चांगलाच घाम गाळला. पण प्रॅक्टीस सुरू असतांना काही असं घडलं ज्याची कल्पना कोणालाही नसेल. बांग्लादेशचा कॅप्टन मुर्तजा भारतीय संघाकडे वळला आणि जेथे युवराज सिंग उभा होता त्या ठिकाणी आला.
मुर्तजा त्याच्याकडे येतोय हे कळताच युवराजने शेकहँडसाठी हात पुढे केला पण त्यावेळेस कर्णधार मुर्तजा हा युवराजचे पाय धरु लागला. युवराज पण जरा हैराणच झाला आणि त्याला असं करणयापासून रोखलं. त्यानंतर युवराजने त्याला अलिंगन दिलं.