मुंबई : टीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या स्मार्टफोनचा बोलबाला आहे. ओपो एफ ३ हा नवा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. 


भारतीय क्रिकेट मंडळाचे कार्यकारी संचालक राहुल जोहरी आणि ओपोच्या कार्यकारी संचालकांच्या हस्ते जर्सीचे अनावरण करण्यात आले. टीम इंडियासाठी लॉन्च करण्यात आलेल्या नव्या जर्सीमध्ये फार काही बदल केल्याचे जाणवत नाही. 



भारतीय क्रिकेट संघाचा ब्रँड पार्टनर असल्यामुळे नव्या जर्सीवर ओपो असे ठळक अक्षरात लिहिल्याचे दिसेल. जर्सीच्या दर्शनी भागासह डाव्या बाहीवर देखील कंपनीचे नाव असणार आहे. तर जर्सीच्या दर्शनीय बाजूच्या उजव्या बाजूला सर्वात वरच्या भागावर नाईकीचा सिम्बॉल असणार आहे.


डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो छापण्यात आला असून, बीसीसीआयच्या लोगोवरती तीन स्टार छापले आहेत. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या जर्सीचा फोटो लोड करण्यात आलाय.