कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून वर्ल्डकप जिकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी आणि इतर क्रिकेटपटू भावुक झालेले दिसले. विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सॅमी आणि ड्वायेन ब्राव्होने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने कोणत्याही क्रिकेटपटूला मदत केली नाही. सेमीफायनलमध्ये सामना जिंकल्यानंतर क्रिकेटपटूंचे कौतुकही केले नाही. वेस्ट इंडिजने केवळ क्रिकेटपटूंची एकजुटता आणि कोचिंग स्टाफच्या मदतीमुळे वर्ल्डकप जिंकल्याने सॅमीने सांगितले. 


हा विजय आपण वेस्ट इंडिजच्या क्रिकेट चाहत्यांना समर्पित करत असल्याचेही सॅमीने सांगितले. सॅमीसोबत वेस्ट इंडिजचा अनुभवी क्रिकेटपटू ड्वायेन ब्राव्होनेही वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंना जी मदत मिळायला हवी होती ती मिळाली नाही. याउलट त्यांच्यापेक्षा अधिक मदत बीसीसीआयने वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंना केल्याचे तो म्हणाला. 


खुद्द सचिन तेंडुलकरनेही विडींज टीमला खरे चॅम्पियन म्हणताना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला संघाला सपोर्ट तसेच त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.