माझ्या कॅप्टनशीपचा निर्णय बीसीसीआय घेईल
टेस्ट क्रिकेटमधून धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या टेस्ट टीमच्या कॅप्टनसीची धुरा विराट कोहलीकडे गेली
मुंबई : टेस्ट क्रिकेटमधून धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या टेस्ट टीमच्या कॅप्टनसीची धुरा विराट कोहलीकडे गेली, पण वनडे आणि टी 20 मध्ये मात्र धोनीकडेच भारताचं नेतृत्व आहे. आता विराट कोहलीकडेच तिन्ही फॉरमॅटची कॅप्टनशीप द्यावी अशी मागणी भारतीय टीमचा माजी मॅनेजर रवी शास्त्रीनी केली होती.
कॅप्टनशीप बदलाबाबतच्या या सगळ्या बातम्यांवर आता धोनीनंच प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या कॅप्टनशीपचा निर्णय मी नाही तर बीसीसीआय घेईल, असं धोनी म्हणाला आहे. तसंच मी सध्या क्रिकेट खेळणं एन्जॉय करत असल्याची प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी धोनीकडेच कॅप्टनशीपची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.