मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयला मोठा झटका बसला आहे. आयसीसीमधील बीसीसीआयची मक्तेदारीचं आता संपुष्टात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनात्मक सुधारणा आणि आर्थिक संरचना या मुद्द्यावर बीसीसीआय़ एकटी पडली आहे. दुबईत झालेल्या आयसीसीच्या बैठकीत प्रशासन, घटनात्मक सुधारणा आणि आर्थिक संरचना या मुद्द्यावर मतदान घेण्यातच आलं. 


बीसीसीआयनं सुधारणाविरोध मतदान केलं. यात भारातला केवळ क्षीलंकेचा पाठिंबा मिळाला. तर इतर सदस्यांनी सुधारणेच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे बीसीसीआय एकाकी पडली. दरम्यान, आयसीसीच्या सध्याच्या आर्थित संरचनेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचं वर्चस्व आहे. 


भारताला आयसीसीच्या नफ्यातून दरवर्षी दशलक्ष डॉलर रक्कम मिळते. मात्र, आता ही रक्कम निम्म्यावर येणार आहे. दबावतंत्र म्हणून भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आज निर्णय अपेक्षित आहे.